Saturday, October 8, 2011

औरंगजेबास दाखवला मराठ्यांचा हिसका...संताजी घोरपडे

मराठ्यांचे राज्य अस्ताला आले होते..औरंगजेबाने मराठ्यांच्या राज्याची धुळदान केली होती....

मराठ्यांचा युवराज...हो युवराजच म्हणेल मी कारण महाराजांच्या मृत्युनंतर.. नुकतेच गादीवर बसलेल्या युवराजाला सावरायला वेळ मिळालाच कुठे... एका वर एक आक्रमणे...जेवढ्या दिशा तेवढे शत्रू तेवढी आक्रमणे....अश्या संकटातून त्या युवराज्याने मार्ग काढला...शत्रूची धुळदान उडवली...कुणालाही पटणार नाही असा पराक्रम त्या युवराजाने केला....अश्या युवराजाला, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने दगा फटका करून पकडले आणि ठार केले..स्वराज्याचा कणा गेला...स्वराज्याचा आत्मा तर आधीच गेला होता.. आत्ता शरीरानेही साथ सोडली होती..महाराज गेले .. युवराज गेले...ह्या स्वराज्याला आत्ता वाली कोण ???
शैतानाचे दुसरे रूप म्हणजे औरंगजेब...तो जेवढा क्रूर होता तेवढाच तो धुर्तही होता...पक्का हाडाचा आणि जातीचा लढवय्या आणि राजकारणी होता...
अश्या ह्या क्रूर दिग्गज..अतिधूर्त..शैतानाची सावली मऱ्हाठ्यांच्या स्वराज्यात पडत होती.. सावली पडेल तिथला भाग उजाड व्हायचा...शहाजी महाराजांनी दाखवलेले, शिवरायांनी प्रत्यक्षात उतरवलेले, शंभू राजांनी टिकवलेले तेच ते स्वराज्य ...... त्याच स्वराज्यात सगळीकडे अंधकार पसरत चालला होता...आत्ता एकच आशेचा किरण होता.. तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराज.......पण औरंगजेबाने लावलेल्या नासधुसिच्या सपाट्या पुढे आत्ता काही टिकाव लागेल असे वाटेना...त्यातही अतिशय शूर वीर संभाजी राजेंना पकडून मारण्यात आले.. ते असते तर कितीही मोठे संकट पार केले असते पण त्यांनाच कपटाने मारले होते असा महाधूर्त औरंगजेब मराठ्यांची सत्ता पूर्ण पणे नेस्तेनाबुत करायलाच आला होता...
त्या मूळे आत्ता ह्या स्वराज्यात लोकांनी उजेडाची अपेक्षाच सोडली होती....

काही काल का असेना स्वराज्याने दाखवलेली स्वप्ने..आपली माणसे,.. आपली सत्ता.. आपली शेते आणि आपली पिके..आपले डोंगर..आणि आपले किल्ले..आपले सैन्य आणि आपला राजा...हे सगळे धुळीत मिळाले होते.. काहीच उरले न्हवते....
आजू बाजूची राज्य औरंगजेबाने कधीच खिशात घातली होती...स्वराज्यातील अनेक किल्लेदार ठाणेदारांनी लढायच्या आधीच शरणागती पत्करली होती.. तर काही जन अवसान गळाल्या सारखे लढत होते..काही जीकरीने लढत होते.. पण यश काय कुठे येतच न्हवते...
राजाराम महाराज रायगडातून बाहेर पडले..पण औरंगजेबाचे सैन्य सतत त्यांच्या मागावर असल्याने.. त्यांनी पन्हाळा गाठला...पन्हाळ्यावरूनच सूत्रे हलवण्याचा निर्धार केला...
सगळी कडे स्वराज्याची नासधूस चालू होती...

औरंगजेबाचा डेरा तुळापुरी पडला होता.... इथेच त्याने संभाजी राज्यांना संपवले होते...
अश्या ह्या अंधारमय स्वराज्यात चैतन्य नावाची गोष्टच शिल्लक राहिली न्हवती...
अश्या वातावरणात शंभू महादेव डोंगराच्या पायथ्याशी कसली तरी कुजबुज चालू झाली....
बैठक बसली होती...वातावरण चिंतामय होते...सल्लामसल्लत चालू होती...
५-६ हजारांवर सैन्य होते.. आणि बैठकीत.. स्वराज्याचे उरले सुरलेले काही सरदार होते..
संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे (दोघेही संताजी घोरपडेंचे बंधू), विठोजी चव्हाण, इत्यादी निवडक शूर वीर निर्भीड सेनानी होते ...
बैठकीत चर्चा मसलत झाली... औरंगजेबाने स्वराज्यात चालवलेली नासधूस कशी रोखायची ह्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न चालू होता...तेवढ्यात.. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांना एक धाडसी कल्पना सुचली...सगळी कडे नासधूस करणाऱ्या औरंगजेबाच्या मूळ छावणीतच आपण नासधूस केली तर????
औरंगजेबाची मूळ छावणी तुळापुर ते वडू कोरेगाव पर्यंत पसरलेली होती...लाखोंची फौज औरंगजेबाच्या दिमतीला होती.. त्यात अनेक मराठी सरदारही सामील होते...तुळापुर ते वडू एवढी त्या छावणीची व्याप्ती होती... २-३ मैल त्याचा परीघ होता.. एवढ्या मोठ्या छावणीची नासधूस करायचा विचार करणे हे हि मोठे धाडसाचे काम म्हणायला हवे..त्यात ती छावणी होती साक्षात महाधूर्त, क्रूर औरंगजेबाची... संताजी आणि धनाजींना हि कल्पना आली कुठून...

नक्कीच संभाजी महाराजांचा छळ कपटाने, दगा फटक्याने केलेल्या खुनाचा रोष संताजी , धनाजी ह्यांच्या मनात होताच.. तो वचपा काढायचा असेल तर तिथेच ह्या सर्व जालीम सत्तेच्या मुळावरच आघात घालायला हवा.. असा विचार त्यांच्या मनात आला... मराठ्यांच्या छत्रपतींना संभाजी राज्यांना मारले पण मराठ्यांनी त्यावर काय केले.. मराठे षंड झालेत कि काय असा सवाल वारंवार संताजी आणि धनाजींना भेडसावत होता.. त्यात बऱ्याच सरदारांनी.. किल्लेदारांनी आपली शस्त्रे टाकली होती...कुठे तरी हे सगळे थांबायला हवे.. मराठ्यांचे रक्त काय आहे हे त्या औरंग्याला दाखवून द्यायला हवे असे संताजी आणि धनाजी यांना वाटत होते... मराठे आपला आत्मविश्वासच हरवत चालले होते..औरंगजेबाशी आपण टक्कर देऊ शकतो.. हेच त्यांच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे वाटत होते.. अश्या परिस्थितीत,.. मराठ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अश्याच धाडसी बेताची गरज होती..जर हा बेत यशस्वी झाला तर मराठे विश्वास ठेऊ लागतील औरंगजेबाच्या छावणीची नासधूस आपले सरदार करू शकतात तर आपणही औरंगजेबाशी दोन हात नक्कीच करू शकू ...अश्या प्रकारचा आत्मविश्वास दुनावण्यासाठी ह्या सारख्या धाडसी बेताची नितांत आवश्यकता होती...
पण हा बेत निव्वळ धाडसी न्हवता तर अशक्यप्राय देखील होता...

ह्या बेतावरून शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची आठवण झाल्यावाचून राहत नाही..शिवरायांनी शाहिस्तेखानच्या डेऱ्यात जाऊन शाहिस्तेखानावर हल्ला केला त्या धाडसाची आठवण झाल्यावाचून राहत नाही...
नक्कीच संताजी आणि धनाजींनी शिवरायांच्या ह्या कार्यातून प्रेरणा घेऊन हा बेत आखला होता.
संताजींचे वडीलही संगमेश्वरात संभाजी महाराजांच्या रक्षणात खर्ची गेले होते.. संभाजी महाराजांना कुठे तरी आपण वाचवू शकलो नाही हि देखील खल त्यांना कायम बोचत होती...
शेवटी संताजी गंभीरपणे म्हणाले, " फलटण च्या खानाचा समाचार धनाजी आपण घ्यावा, पाठीवर डोंगर असावा. माझ्या बरोबर दोन हजार स्वार सडे एकांडे निवडक द्यावे. शिवाय माझे पथकांनीशी तूळापुराचे मुक्कामी जाऊन बरायखुद (स्वतः) पादशहा याजवर मी छापा घालतो. (आम्ही) मराठे आहोत असे खाशास (औरंगजेबास) कळवून येतो."
धनाजी रावांनी संतानींचे हे बोल ऐकल्यावर लगेचच संताजींना शाब्बासकी दिली.. व म्हणाले.. " फार चांगले, शाब्बास..सोबत विठोजी चव्हाण असावेत .. छत्रपतींच्या नावे कारवाई चोख व्हावी..खुद्द आम्ही रणमस्त खानाचा अन , शहाबुद्दीन खानाचा समचार घेतो..कामगिरी फत्ते करूनच येतो..."

विठोजी चव्हाणही लगेच तयार झाले...मनोमनी संताजी खुश झाले...मोठी जवाबदारी संताजींवर येऊन पडली होती...ह्या जवाबदारीत कुठेही छोटीशी ही चूक होऊ नये ह्या साठी संताजी मनोमनी छाप्याची आखणी करत होते...
असे असतांनाच त्यांना आठवण झाली ती "शिवरायांच्या जालना स्वारीची"...शिवरायांची शेवटची स्वारी..जालना ४ रोज मराठे लुटत होते..एवढी संपत्ती मराठ्यांनी त्या येळी शिवरायांच्या नेतृत्व खाली गोळा केली होती..हि लुट परत आणतांना रणमस्त खानाने पिछाडीवर हल्ला चढवला..शिवरायांनी सिधोजी निम्बालकारांना पिछाडीवर त्या खानाशी दोन हात करायला ठेवले...निम्बाळकर जीव लावून लढले.. ३ रोज रणकंदोळ जाहला......सिधोजींना वीर मरण आले...त्यातच मोघलांनी खुमक पाठवली.. ती यायच्या आत शिवरायांनी चपळाईने..माघार घेऊन "पट्टा" किल्ल्यावर सुखरूप पोहचले...
त्या येळेला..संताजीवर युद्धासमयी उतावळी केली म्हणून ठपका ठेवला गेला होता.. महाराज, मानाजी मोरे आणि संताजीवर इतरज झाले अन त्यांना माजुरीयास (मुजऱ्यास) येऊ दिले नाही...हे सगळे संताजीला आठवले.. परत असा कुठला आतेतायी पणा होऊ नये... शिवराय नाहीत इथे चुका दुरुस्त करायला आणि सांभाळून घ्यायला हि जाणीव झाली... त्या मुळे आत्ता कुठे चूक होता कामा नये हा निर्धार केला.. तसेच धनाजी जाधवांना त्या रणमस्त खानाने दिलेल्या त्रासाची आठवण करवून दिली... 
संताजी म्हणाले ,.." जाधवराव.. त्या रणमस्त खानाला सोडू नये.., जालनेच्या येळेला.., ह्याच खानाने आपल्याला दमवले होते.. सिधोजी कामाला आले ते ह्याच मुळे... आत्ता आपण त्यास अस्मान दाखवावे..."

जाधवराव संताजीस म्हणाले.." निश्चिंत राहावे...खानाला धूळ चारल्याशिवाय आमचे परत येणे, न होणे...आपण आपली कामगिरी पूर्ततेस न्हेने...दोहो कडे यश मिळाले तर आपल्या अखंड सैन्यास भक्कमता लाभेल.. "
त्या नंतर...जाधवारावांनी आपल्या कडील मावळ्यांपैकी २ हजार सडसडीत मावळे निवडले...त्यांना संताजींच्या खास पथका सोबत जोडले.. विठोजी चव्हाणही तयार झाले...
सर्वांनी मिळून "जय भवानी, जय शिवाजी", असा घोष केला.... .. संताजी अन जाधवराव आपापल्या वाटेला वळले... धनाजी राव...फलटनकडे कूच झाले.. तसेच संताजींनी जेजुरीकडे कूच केले...
सेनापतींनी सैन्य घेऊन थेट जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले..."जय मल्हार" घोषणा झाल्या.. सैन्याचे मनोबल उंचावले.... 'कालभैरवाने" जसे ब्रह्माचे गर्व हरण केले त्याच प्रमाणे संताजीचे सैन्य.. जणू काही औरंगजेबाची मस्ती जिरवायलाच सज्ज होऊन पुढे निघाले... पुढे जाऊन दिवे घाटात पाडाव पडला...

संताजींनी सैन्याचे मनोधैर्य वाढण्यासाठी सैन्याशी हितगुज केले... एवढ्या मोठ्या सैन्यात कसे घुसायचे...कुठल्या मार्गाने जायचे..कसे आक्रमण करायचे.. मग कोणावर कुठली जवाबदारी...सगळे काम फत्ते झाले कि तिथून कसे निसटायचे ह्याचा बेत आखला गेला... गुप्तहेरांनी दिलेल्या माहिती मूळे योजना आखण्यास भरपूर मदत झाली...संताजींनी सगळ्यांना नियोजित कार्ये सांगितली.......त्या नुसार.. तूळापूराच्या दिशेने कूच करण्यास संताजींनी आदेश दिले... पहाटेच सुरवात करून दुपार पर्यंत तूळापूराच्या जवळच्या भागात विश्रांतीला आले...विश्रांती घेतली...सैन्याची सर्व हालचाल हि शक्यतो झाडी बघूनच होत होती..अंधार पडल्यावर.. सर्व तयारी करून संताजींनी तुळापुर कडे प्रवास चालू केला.... परीक्षेची घटका जवळ आली होती...जे काही ठरवले होते..ते त्या त्या प्रमाणे पार पाडण्यासाठी सगळ्यांचेच कौशल्य., शूर वीरता.. चातुर्य, प्रसंगावधान पणाला लागणार होते
अग्नी परीक्षेचीच वेळ होती ती...तूळापूरी डेरा ३ कोसावर आला.. तेवढ्यात मोघली सैन्य दिसू लागले.. संताजींनी सैन्यास सावध पवित्र घेण्यास सांगितला...सगळे सावधपणे थोडे जवळ जाऊन थांबले..कोणीही आतेतायी पणा करू नये.. असा दम संताजी रावांनी आधीच दिला होता..

संताजींनी अंदाज घेतला.. ती तुकडी रात्रीच्या पहाऱ्याची होती... संताजींनी निरोप धाडला..."बादशहाच्या लष्करातील मराठा सरदार.. शिर्के व मोहितेंचे सैन्य आहे..,...मोहिमेवर गेलो होतो..बदली स्वार आले.. म्हणून परत लष्करास जातो..." ह्या वरून संताजींना किती खडा नि खडा माहिती होती ह्याचा अंदाज येतो.. बादशहाच्या चाकरीतील मराठा सैन्याची आतबाहेर येण्या जाण्या साठीची खुण देखील संताजीने आपल्या गुप्तहेरां तर्फे मिळवून ठेवली होती...
मोघली सैन्याला खुण पटली...व त्यांनी हे सैन्य आपल्याच बादशहाच्या चाकरीतले.. मराठा सरदारांचे सैन्य समजून वाट मोकळी करून दिली....छावणीची सुरवात झाली...मध्यरात्रीची वेळ असल्याने.. पहारा देणारे पथके सोडून बहुतांशी सैन्य झोपी गेले होते...वेळेचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशहाच्या डेऱ्या कडे कूच केले...
बादशहाचा तो भव्य दिव्या डेरा समोर आला...त्या भोवताली.. सैन्याचे सुरक्षा कडे होते...
संताजींनी सैन्यास गटा गटा मध्ये विभागले.. व एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू केला.. बादशहाच्या छावणीवर हल्ला सुरु झाला... साखर झोपेत असलेले बादशहाचे सैनिकांना काही कळायलाच मार्ग न्हवता कि नेमका काय प्रकार चालू आहे... कारण एवढ्या आत मध्ये येऊन कोणाचा हल्ला होऊ शकेल असाही विचार कधी त्यांच्या डोक्यात आला नसेल...

बादशहाच्या मुख्य डेऱ्यावरही आक्रमण केले...खुद्द संताजी त्यास मार्गदर्शन करत होते...मिळाला तर बादशहालाच आडवा पाडू असाच काही निर्धार होता...पण बादशाहाला बादशाही सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवले...संताजी आणि सैन्याने.. औरंगजेबाच्या डेऱ्याचे तनावे तोडले.. डेरा कोसळला...डेरा जमीनदोस्त केला.. डेऱ्याचा कळस सोन्याचा होता.. तो विजयाची निशाणी म्हणून कापला..मिळेल त्या मोघली सैन्याला कापायचे चालू होते... जेवढी शक्य होईल तेवढ्या गोष्टींचे नुकसान करणे चालू होते.. तंबू उखडणे.. सैन्य मारणे.. वस्त्रे, धान्ये.. जे दिसेल त्याची नासधूस करण्याचे काम चालू होते.. हर हर महादेव म्हणून जयघोष चालू होता.. जय भवानी जय शिवाजी" अश्या घोषणा दुमदुमत होत्या...बादशाही सैन्यात सतर्कता पसरतेय , व बरेच सैन्य लढाई साठी तयार होतेय हे बघून संताजीने...आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा दिला. गटा गटाने.. बादशाही सैन्याचीच दुफळी करून.. उडालेल्या..गोंधळाचा फायदा घेऊन संताजीचे सैन्य गटा गटाने औरंगजेबाच्या छावणीतून बाहेर पडले....